शनिवार, १ जुलै, २०२३

ग्रामपंचायती होणारं भ्रष्टाचारमुक्त.

 

ग्रामपंचायतीमध्ये होणारं DIGITAL PAYMENT

डिजिटल इंडीया अंतर्गत आता ग्रामपंचायती मध्ये सुद्धा डिजिटल payment सुरू केलं जाणार आहे. देशात मोठ्या प्रमाणात डिजिटल Payment चां वापर होत असताना याचा पुढचा टप्पा म्हणून डिजिटल पेमेंट सुविधा ग्रामपंचायत मध्ये सुरू केली जाणार आहे.

केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाने परिपत्रक काढून हा निर्णय जाहीर केला आहे. राज्य व केंद्रशासित प्रदेशातील सर्व ग्रामपंचायतींना येत्या स्वातंत्र्य दिनापासून म्हणजेच १५ ऑगस्ट २०२३ पासून लागू होणार आहे. 


देशभरातील ग्रामपंचायती सर्व विकास कामासाठी आणि महसूल संकलनासाठी डिजिटल Payment सुविधा स्वीकारण्याचा नियम लागू आहे. यासंबंधी अधिकारी वर्गाला ब्लॉक (तालुका) आणि जिल्हा स्तरावर प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

या डिजिटल पेमेंट सुविधेमुळे नक्कीच भ्रष्टाचाराला आळा बसेल, परस्पर केले जाणारे आर्थिक व्यवहाराला ही आळा बसेल. त्याचबरोबर ग्रामपंचायतीचां आर्थिक व्यवहार ही पारदर्शक होईल.