स्पर्धा परीक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्पर्धा परीक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २९ जून, २०२३

TALATHI BHARATHI
महाराष्ट्र महसूल विभागांतर्गत तलाठी या पदाची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली. पदवी पात्र तरुण तरुणींसाठी ही सरकारी नोकरीची चांगली संधी आहे . २०१९ नंतर आलेली जाहिरात असल्यानं सरळसेवा आणि तत्सम पदाची तयारी करणाऱ्या परीक्षार्थीसाठी सुद्धा ही  चांगली संधी आहे. तर दुसरीकडं पोलीस भरती केलेल्या पण पोलीस भरतीत अपयश आलेल्या पदवीधर तरुण तरुणींसाठीसाठी सुद्धा हि एक मौल्यवान संधी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध पदाचा अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थी सुद्धा या पदासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक असतात. सर्वात महत्वाचं म्हणजे या परीक्षासाठी अभ्यास करणारा बहुतांश परीक्षार्थी वर्ग हा ग्रामीण भागातला त्यातही शेतकरी , शेतमजूर आणि सर्वसामान्य घरातून आलेल्या मुला मुलींचं प्रमाण अधिक आहे. 
परीक्षा यंत्रणा आणि पारदर्शता 


तलाठी भरती प्रक्रिया पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे त्यासाठी खाजगी संस्थांना ते काम देण्यात आलं आहे या संस्था या क्षेत्रांत नक्कीच तांत्रिक दृष्टया विकसित आहे आणि तसा परीक्षा घेण्याचा अनुभव ही संबंधित यंत्रणेजवळ असल्याचं सांगण्यात येत आहे तरीही यंत्रणेचा किंवा पदाचा गैरवापर करून कोणी आपलं उकल पांढर करून घेणार नाही याची काळजी संबंधित यंत्रणेंन घेतली जावी . ऑनलाईन परीक्षा पद्धतीत भूतकाळात काही चुका सरकारी यंत्रणेत झाल्या होत्या त्यामुळं त्या गुंडाळून ठेवण्याची वेळ सरकार वर आली होती हा अनुभव आहे याच अनुभवातून संबंधित यंत्रणेनं धडा घेण्याची आवश्यकता आहे . 


परीक्षा केंद्रावर उपाय योजना 

परीक्षा केंद्रावर उपाय योजना म्हणून परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींची आधार कार्ड सह बायोमॅट्रिक केली जावी .

 परीक्षा हॉल CCTV  कॅमेरा अंर्तगत असावेत ,त्याचबरोबर प्रत्येक संगणकावर वेबकॅम समोर परीक्षार्थी परीक्षा घेतली जाण्याची सोय करण आवश्यक आहे.